जालना जिल्ह्यातील भगवानगर गावातील जवानाचा जम्मु-कश्मिरमध्ये अपघाती निधन

जालना जिल्ह्यातील लष्करी जवानाचा जम्मु-कश्मीरमध्ये अपघात झाला होता. या जवानाचा उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेने अंबड तालुक्यातील भगवाननगर गावावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

भगवाननगर येथील चंद्रकांत उर्फ पप्पू महादेव सुळे (31) हा जम्मू कश्मीर येथे सैन्य दलातील 216 मेडियम रेजिमेंट  तोफखाना या युनिटमध्ये मेड पदकाचे शिपाई आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षणपासून बीएससी अ‍ॅग्री पर्यंत राहुरी एमआयडीसी मधील छत्रपती शिवाजी माध्यमिक महाविद्यालयामध्ये शिक्षण पूर्ण झाले. चंद्रकांत सुळे यांचे मामा  अगोदरपासूनच हिंदुस्थान सैन्यात असल्यामुळे बालपणापासूनच त्यांना देशसेवेची आवड निर्माण झाली. 2010-11 सालामध्ये नगर येथे सैन्यात भरती
झाले. नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण करून आपल्या गावी परतल्यानंतर भरतीपूर्व प्रशिक्षण पूर्ण झाले. तरीपण त्यांच्या आई-वडिलांना याची माहिती नव्हती. जेव्हा प्रशिक्षण पूर्ण करून चंद्रकांत सुळे भगवान नगरमध्ये आल्यानंतर आपला मुलगा हिंदुस्थान सैन्यात दाखल झाल्याचा आनंद आई- वडिल आनंदाने भारुन गेले. घरातील परिस्थिती तशी जेमतेम असल्यामुळे वडील महादेव सुळे शेती व शेतीला जोड धंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करतात. आताच तीन महिन्यापूर्वी नाशिक जिल्ह्यातुन जम्मू कश्मीर येथे त्यांची बदली. तीन महिन्याच्या महिन्याच्या सेवा बजावून ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात गावाकडे सुट्टीवर आले होते. सुट्टी संपून ते गेल्या आठवड्यात सेवा बजावण्यासाठी रुजू झाले होते.

24 सप्टेंबर रोजी उत्तर कश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्यातील मुख्य शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर बारी बैहका जवळ दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यांना सैनिकी रुग्णालय ड्रगमुल्ला येथे हलविण्यात आले. उपचार सुरू होते. वडील महादेव सुळे यांना शनिवारी फोन लावून गावाकडील हलचाली बद्दल जवान चंद्रकांत यांच्यासोबत चर्चा केली. तसेच त्यांच्या पत्नी उज्वला सुळे यांच्याशी देखील फोनवर बोलणे झाले. परंतु मंगळवारी सकाळी दोन-तीनच्या दरम्यान अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यावेळी त्यांची कोवीड चाचणी घेण्यात आल्या होत्या. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने वडील-चंद्रकांत यांच्या पत्नीसह पाच नातेवाईक पाठवण्यात आले आहे. मुळ गावात अंत्य संस्कार करण्यासाठी रास्ता रोकोचा प्रयत्न चंद्रकांत सुळे यांच्यावर शासकीय इतमात गावाकडे अंत्यसंस्कार करण्यात यावे यासाठी गावातील परिसरातील तरुणांनी संभाजीनगर-बीड राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला असता गोंदी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदिप जोगदंड व पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे सदर युवकांना मध्यस्थी केल्यानंतर तरुण शांत झाले. त्यांच्या पश्चात वडील महादेव सुळे, आई पार्वती सुळे, पत्नी उज्वला सुळे, भाऊ विशाल, बहिण जयश्री, छाया  असा मोठा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या