
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आष्टी पासून जवळ असलेल्या आनंदगाव शिवारात विज पडून एक महिला ठार तर एक महिला जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे .
आनंदगाव शिवारातील गट नं 56 मधील शेतात महिला कापूस वेचणी करीत असताना अचानक विजेच्या कडकडासह पाऊस सुरू झाल्याने लिंबाच्या झाडाखाली थांबलेल्या सूर्यकांता गोरखनाथ गायके (40), मथुरा गणेश काळे (42 )या महिलांच्या अंगावर वीज कोसळल्याने दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी जालना येथे नेत असताना सूर्यकांता गायके या महिलेचा मॄत्यू झाला तर मथुरा काळे या गंभीर जखमी आहेत.



























































