कोरोना नियमांचे तीन तेरा! जालनेकरांची खरेदीसाठी गर्दी

जालना जिल्ह्यात दररोज हजारोंच्या आसपास कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले असताना जालनेकर मात्र सुशेगात नियमांचे उल्लंघन करत गर्दी करताना दिसत आहेत. जालनेकरांच्या बेफिकरीमुळे दररोज बाजारपेठेत नागरिक रेलचेल करुन खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

आज जालना शहरातील मुख्य बाजारपेठे असलेल्या फुल मार्केट, भाजीमार्केट, खवा मार्केट या भागात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिकांना सततची रुग्ण वाढ व मृत्यू दराचेही काहीही सोयरसुतक नसल्याने दिसून येत आहे. दररोज सकाळी 7 ते 11 पर्यंत बिनदिक्कतपणे तोंडावर मास्क न लावता अनेक दुकानदार व फुल विक्रेते दिसुन येत आहे. त्याचा परिणाम रुग्ण वाढीवर होत असल्याने जालनेकरांसाठी मोठी धोक्याची घंटा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या