जालन्यात वाळू माफियाच्या ट्रॅक्टरने घेतला तरुणाचा बळी

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड -पैठण रस्त्यावर महसूल आणि पोलीस प्रसानाच्या भ्रष्ट धोरणाने अवैध वाळु वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने एका 30 वर्षीय तरुणाचा बळी घेतला असून यात एक मुलगा जखमी झाला आहे. सदरील घटना काल 28 मे रोजी रात्री साष्टपिंपळगाव येथे घडली आहे.

काल 28 मे मंगळवारी रात्री सोपान जर्नाधन टेकाळे (30) बळेगाब, अंबड येथील रहिवासी असून आपल्या भाच्यासोबत काम आटोपून गावाकडे मोटरसायकलवर बळेगावाकडे जात असताना भरधाव वेगाने जाणार्‍या वाळूच्या ट्रॅक्टरने साष्टपिंपळगाव येथे जोराची धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला तर भाचा मोटार सायकलवरुन बाजूला पडुन तोही जखमी झाला आहे, सोपान उपचारासाठी शहागड येथे नेले असता डॉक्टरने त्यास मृत घोषित केले. सोपानचा भाचा सुरज संतोष राखुंडे रा. सुखापुरी (14) वर्षे याला मोठ्या प्रमाणात मुक्कामार लागलेला असून तो वेड्याबाबळी जाऊन पडलेला होता. त्यालाही दवाखान्यात दाखल करण्यात आलेले आहे.

विशेष म्हणजे सोपानला ज्या ट्रॅक्टरने उडवले, त्या ट्रॅक्टरला लाईट नसल्याचे प्रत्येकदर्शिने     सांगितले. सोपानच्या मोठ्या भावाचे 2014 सालामध्ये सैन्य दलात असताना कुलरमध्ये पाणी भरतांना शाँक लागुन निधन होते. सोपान हा एकुणताएक मुलगा राहीला होता. त्याच्या पण वाळु माफियाने बळी घेऊन टेकाळे कुटुंबावर दोन्ही मुले गेल्याने दुखाचा डोंगर कोसळला आहे.

रात्री झाले की वाळु वाहतूक माफीयांचे हायवा ट्रँक्टरचा गोदापात्रात धुडगूस सुरू राहतो. पोलीस प्रशासन व महसुल विभागाचा धाक उरलेला नाही. जास्तीत जास्त खेपा रात्रीतुन कशा होतील. ऐवढेच वाळु माफीयांच्या डोक्यात राहते. त्यामुळे वाहनांना ब्रेक नसतो. अवैध वाहतुक करणारे वाहने रस्त्यावर बेफाम धावतच राहतात, कारवाई झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी पुन्हा वाळू माफियांची धुडगुस सुरु होते. नावापुरतीच महसूल प्रशासन आणि गो़दी पोलीस कारवाई करतात. ठोस कारवाई करून वाळू उपसा बंद होत नाही तोपर्यंत असेच बळी जाणार आहे. कारवाई कमी आणि दोन्ही खात्याची प्रसिद्ध जास्त भर देवुन महसूल विभागाच्या व पोलिसांच्या अर्थपुर्ण मैत्रीमुळे गोदापात्रात वाळु उपसा करण्यासाठी रात्रंदिवस वाळुमाफीया ठिय्या मांडुन बिनभोभाट वाळू उपसा सुरू राहतो. काल निष्पाप तरुणांचा वाळु माफीयाने बळी घेतला. या अगोदरही अनेकदा बळी घेतले तरी वाळू उपसा बंद होत नाही, सोपान टेकाळे यावर गोदाकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे, सोपान यास पश्चात आई, वडील, दोन बहीणी,पत्नी, लहान मुलगा असा परिवार आहे. अपघात केलेला ट्रॅक्टर चालक
ट्रक्टरसह फरार झाला आहे.