जालना – बाधितांचा आकडा 2600 पार; 2482 जणांना डिस्चार्ज

418

कोरोनाचा संसर्ग अटोक्यात येण्यासाठी जिल्हा प्रशासन अटोकाट प्रयत्न करीत असून परंतु अद्यापपर्यंत कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागलेला नाही. आज पुन्हा ५९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून आजपर्यंत जालना जिल्ह्यात २ हजार ६५५ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच कालपर्यंत ८४ कोरोना बाधित रुग्णांचा बळी गेला आहे. तर आज २० कोरोना बाधित रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण ७९७५ झाले आहे. सध्या रुग्णालयात ४२४ व्यक्ती भरती आहेत. एकुण भरती केलेल्या व्यक्ती ३०७३, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या ३४९ एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या १६ हजार ३२२ एवढी आहे. एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या २६५५ एवढी आहे. यर उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या २४८२ इतकी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या