जालन्यात परतीच्या पावसाचा धुमाकुळ, पिके पाण्याखाली

जालना जिल्ह्यात परतीच्या पावसाने धूमाकूळ घातला असून शनिवारी भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे शेकडो हेक्टर जमिनीवरील पिकं पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

यंदा पारध परिसरात सुरूवातीपासुनच निसर्ग मेहरबान असल्यामुळे खरिप पिकेही जोमात आली आहे. मका व सोयाबीन हे देखील सोंगणीला आले त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी  मका व सोयाबीन सोंगणीला सुरूवात देखील केली होती. त्याच दरम्यान, हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा देत शेतकऱ्यांना सतर्कतेचा

इशारा दिला होता. त्यानुसार पारध परिसरातील पिंपळगाव रेणूकाई, पारध, खुर्दर्, वरुड, रेलगाव, कोसगाव, मोहळाई, लेहा, शेलुद,आदी भागातील शेतकऱ्यांनी हंगामातील आपली सोंगणीचे कामे आटोपून घेण्यासाठी लगबग सुरु केली होती. मात्र शनिवारी दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पुरते पाणी फिरले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या