येवता येथे अंगावर वीज कोसळून शेतकरी ठार

482

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील येवता येथील शेतकरी शेतात काम करित असतांना अंबादास माधव दळवी (40) यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज 7 ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

माहोरासह येवता परिसरात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक काळे ढग जमा झाले. त्यानंतर विजेचा कडकडाट झाला. येवता येथील त्यांच्या शेतात शेतकरी काम करीत असतांना अंबादास माधराव दळवी यांच्या अंगावर वीज पडूनजागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले आहेत.

दळवी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. माहोरा बिट जमदार सहाने, येवता येथील तलाठी देशमुख व मंडळ अधिकारी वर्गाने यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.

आपली प्रतिक्रिया द्या