Jalna News – हृदयद्रावक घटना! चिमुकल्या भाच्याला वाचवण्यासाठी मामीची विहिरीत उडी, दोघांचाही बुडून मृत्यू

टायर विहीरीच्या दिशेने जात असताना त्याला पकडण्यासाठी पळालेला चिमुकला भाचा टायरासहीत विहीरीत पडल्याचे कळताच त्याला वाचवण्यासाठी मामीने कसलाही विचार न करता थेट विहीरीत उडी घेतली. माञ पोहता येत नसल्याचे दोघांही मामी-भाच्याचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना १९ नोव्हेंबर रोजी दुपारी जालन्यातील बदनापुर तालुक्यातील मालेवाडी गावात घडली.

सध्या उसतोडीचा हंगाम सुरु असल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामीण भागातील उसतोड कामगार बाहेर गावी जातात अशाच एक परिवार आपल्या सात वर्षाच्या चिमुकला रुद्रा वैजिनाथ थोरातला त्याच्या बदनापुर तालुक्यातील मालेवाडी येथील विलास भालेराव या मामाकडे सोडले होते. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास रुद्रा थोरात हा मामी आरती भालेराव सोबत शेतात गेला होता. दरम्यान चिमुकल्याचा मामा विलास भालेराव हा बदनापुरला दवाखान्यात गेला होता. शेतात दोघे असताना रुद्रा हा टायर खेळत होता. खेळता खेळता रुद्राचे टायर विहीरीच्या दिशेने गेले. त्याच वेळी टायर पकडण्यासाठी रुद्राही विहरीच्या दिशेने पळाला. माञ टायरच्या मागे पळता पळता रुद्रा सरळ विहीरीत पडला. रुद्रा विहीरात पडल्याचे कळताच शेतात आजु-बाजुला कोणीच नसल्याने भाच्याला वाचवण्यासाठी मामीने काहीही विचार न करता सरळ विहीरित उडी घेतली. परंतु पोहता येत नसल्याने दोघांचा ही बुडुन दुर्देवी मृत्यु झाला. सायंकाळी बदनापुरहुन आलेल्या विलासला शेतात कोणीही दिसत नसल्याने शोधाशोध केली. त्यावेळी विहिरीच्या काठावर चपला दिसताच घाबरलेल्या विलासने लोकांना बोलावुन विहीरीत शोध घेतला आणि दोघा मामी भाच्याचे मृत्युदेह बाहेर काढले. या प्रकरणी बदनापुर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करत बदनापुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे गावात व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.