जनतेच्या आशीर्वादाची ताकद विकासात रूपांतरित केली – अर्जुन खोतकर

1155

जनतेने मतदानातून दिलेला आशीर्वाद, पाठीशी उभे केलेले बळ सार्थकी ठरविण्यासाठी रस्ते, पाणी, आरोग्य, वीज, सिंचन, सभागृहे, स्मशानभूमींसाठी शेड अशा पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी लक्ष केंद्रित करून विश्वास घात न करता आपली कारकीर्द विकासात रूपांतरित केली असे राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले. जालना विधानसभा मतदारसंघातील पिरपिंपळगाव, घाणेवाडी, तांदुळवाडी, निधोना, माळशेंद्रा,वंजार उम्रद येथे सुरू असलेल्या विकास कामांचे लोकार्पण व शुभारंभ करून राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जनसंवाद दौऱ्यात जनतेशी संवाद साधला. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, भानुदास घुगे, पंडित भुतेकर, संतोष मोहिते, सभापती पांडुरंग डोंगरे,जि.प.सदस्य बबन खरात,प्र भाकर घडलिंग, हरिभाऊ शेळके, बाबासाहेब जऱ्हाड, ब्रम्हा वाघ, कृष्णा कोरडे, चेतन बावणे, कृष्णा खिल्लारे, दिपक कावले, भागवत बावणे आदींची उपस्थिती होती.

राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, या भागातील जनतेला आरोग्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध होण्यासाठी कष्ट सोसून पाच कोटी रुपयांचा निधी दवाखान्यासाठी मंजूर करून या दवाखान्याचे काम प्रगती पथावर असल्याने आगामी काळात मोठी सुविधा उपलब्ध होईल. तातेवाडी व पिरपिंपळगाव येथे तीन सभागृहांची उभारणी करून नवीन मंजूर सभागृहाचे भूमीपूजन केले. घाणेवाडीत तीन कोटी अकरा लाखांची कामे पूर्ण होत असल्याने महिलांसह ग्रामस्थांनी जल्लोषात अर्जुन खोतकर यांचे स्वागत करून एकमुखी पाठिंबा दर्शवला. मंजूर व्यायाम शाळेचे भूमीपूजन केले. तांदुळवाडीत रस्ता व पाणी पुरवठा योजनेस निधी देऊन जलयुक्त ची कामे पूर्ण केली. गौतम नगर साठी स्वतंत्र सभागृह देण्याचे वचन खोतकर यांनी दिले. निधोना येथे स्वतंत्र डिपी, विंधन विहीर, सभागृहाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच वंजार उम्रद व माळशेंद्रा येथे विविध विकास कामांची लोकार्पणे करण्यात आली.

विकास कामांचा ताळेबंद जनतेसमोर मांडत असतांना काही बुजगावणे माहीत नसलेल्या समस्यांचे रडगाणे गात आहेत. त्यांना ग्रामस्थांनीच आपल्या भागात पूर्ण व सुरू असलेली विकास कामे दाखवून द्यावी असे आवाहन खोतकर यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या