पोटच्या मुलाने केला जन्मदात्या आईचा खून, जालना जिल्ह्यात घडली माणुसकीला काळिमा फासणारी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माणुसकीचा काळीमा फासणारी घटना जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील लालवाडी घडली. येथे दारूडया मुलाने वृध्द आईचा तीक्ष्ण हत्याराने गालावर व  डोक्यात वार करून निर्घृण खून केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपी फरार झालेला आहे.

दारूडा मुलगा गोपीचंद बारवाल (35) याने त्यांची आई अन्साबाई बारवाल (60) यांच्यावर हल्ला केला. तीक्ष्ण हत्याराने गालावर व डोक्यावर वार करून आईचाच खून गोपीचंद यांनी केला. गोपीचंद याने आईवर वार केल्यानंतर स्वत:च्या मामाच्या मुलाला फोन करून आपल्या आईला मारून टाकले असे कळवून फरार झाला. गोपीचंद याला दारूचे व्यसन असल्याची माहिती मिळत असून दारूच्या नशेमुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे त्याने हा प्रकार केला या बाबत पोलिस तपास सुरू आहे.

या बाबत माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर, पोलिस निरीक्षक शामसुदंर कोठाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदाम भागवत, सहाय्यक पोलिस निरीक्षक भिमाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून आरोपी फरार आहे. आरोपी गोपचींद भागचंद बारवाल यांच्या विरुध्द भादंवि 302 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.