जेम्स बॉण्डच्या पिस्तुलाचा होतोय लिलाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेम्स बॉण्डची भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेते सीन काॅनेरी यांचे नुकतेच वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. काॅनेरी यांनी सात सिनेमांमध्ये जेम्स बॉण्डची भूमिका साकारली होती. ’डॉक्टर नो’ हा त्यांचा पहिला बॉण्डपट होता. त्यामध्ये त्यांनी वापरलेल्या मूळ पिस्तुलाचा लिलाव होणार आहे. जेम्स बॉण्ड यांची पिस्तुल खरेदी करून सीन काॅनेरी यांच्या आठवणी जपण्याची संधी जगभरातील चाहत्यांना मिळाली आहे.

येत्या 3 डिसेंबर रोजी बेवर्ली हिल्स येथे तसेच ऑनलाईन पद्धतीने जुलियन्स ऑक्शनतर्फे ’आयकाॅन्स अँड आयडॉल्स ट्रायलॉजीŠ हॉलिवूड’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जेम्स बॉण्ड यांची हॅण्डगन विक्रीला ठेवण्यात आली आहे. दोन लाख डॉलर एवढ्या रकमेपर्यंत या गनची विक्री होईल, असा विश्वास लिलावकर्त्यांना आहे.

सीन काॅनेरी यांनी ’डॉक्टर नो’ या पदार्पणातील सिनेमात हातात गन घेऊन ’जेम्स बॉण्ड 007’ चे व्यक्तिमत्व उभे केले. आणि पुढे सहा दशके ’डॅशिंग’ पणाने रसिकांच्या ह्दयावर अधिराज्य केले. जेम्स बॉण्डची गन सुरुवातीला ब्रिटनमधिली बाप्टी या प्रॉपर्टी हाऊसमध्ये होती. त्यानंतर एका लिलावात 2006 साली तिची विक्री झाली होती. ती आजतागायत त्या विक्रेत्याच्या संग्रहात होती, अशी माहिती ज्युलियन्स ऑक्शनच्यावतीने देण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये गनच्या विक्रीसोबत खरेदीदाराला डिऑक्टिवेशन सर्टीफिकेट देण्यात येईल. तसेच बाप्टीचे मूळ पत्रही देण्यात येणार आहे.