
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीर मधील उरी भागात सावत्र आईच्या सांगण्यावरून १४ वर्षाच्या सावत्र भावाने त्याच्या मित्रांसह 9 वर्षाच्या अल्पवयीन बहिणीवर सामूहिक बलात्कार केल्याची भयंकर घटना घडली आहे. एवढे अत्याचार करूनही मन न भरल्याने या नराधमांनी मुलीचे डोळे काढले व तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अॅसिड ओतले. 23 ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा कुजलेला मृतदेह 2 सप्टेंबरला बारामुल्ला येथील जंगलात सापडला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान. याप्रकरणी मुलीच्या सावत्र आई व भावासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
आरोपी महिलेचा पतीच्या दुसऱ्या पत्नी व तिच्या मुलांवर राग होता. पती दुसऱ्या पत्नी व तिच्या मुलांच्या संपर्कात होता. हे पहिल्या पत्नीला खटकत होते. याच रागातून तिने दुसऱ्या पत्नीच्या मुलीचा खात्मा करण्याची योजना आखली. यात तिने आपल्या मुलाची मदत घेतली. त्यानंतर 23 ऑगस्टला मुलगी बेपत्ता झाली. यामुळे कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. पण तिचा कसलाच ठावठिकाणा लागला नाही. यामुळे मुलीच्या आई-वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलीस मुलीचा शोध घेत होते. पण अखेर 2 सप्टेंबर रोजी बारामुल्ला येथील जंगलात मुलीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. मृतदेहावर मारहाणीच्या खुणा होता, तिचे डोळे फोडलेले होते. तसेच तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अॅसिड ओतून ते जाळण्यात आले होते. मृतदेहाची ही भयंकर अवस्था बघून पोलीसही हादरले. त्यानंतर बेपत्ता मुलीच्या आईला ओळख पटवण्यासाठी बोलावण्यात आले. मुलीच्या कपड्यावरून व शरीरावरील खुणांवरून ती आपलीच मुलगी असल्याचे तिच्या आईने सांगितले.
या नंतर पोलिसांच्या तपासाची सूत्रे वेगाने फिरू लागली. मुलीवर सामूहिक बलात्कार व हत्या झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर उरी येथील जनता रस्त्यावर उतरली. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करा व कडक शिक्षा द्या अशी मागणी नागरिकांनी केली. यामुळे पोलिसांवरही दबाव वाढला. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या आई व वडिलांकडे चौकशी केली असता पहिल्या पत्नीचा आपल्या मुलांवर राग असल्याचे वडिलांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या सावत्र आईची चौकशी केली असता ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.
23 ऑगस्ट रोजी आपणच मुलीला जंगलात नेले होते. तिथे गेल्यावर आपला 14 वर्षांचा मुलगा तिथे त्याच्या तीन मित्रांना घेऊन आला. नंतर आपल्या डोळ्यादेखत त्यांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर चाकूने तिच्यावर अनेक वार करण्यात आले. नंतर तिचे डोळे फोडण्यात आले व तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अॅसिड ओतून ते जाळण्यात आल्याचे आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले.
summar-jammu–kashmir-9-year-old-gilr-gangraped-brutally-murder-stepmother-arrested

























































