J&K अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक

667

एकिकडे देश कोरोनाविरुद्ध झुंजत असताना दुसरीकडे दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची दुहेरी लढाई लढत आहे. गेल्या काही काळापासून जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हालचाली तीव्र झाल्या असून सुरक्षा दले त्यांचा खात्मा करण्याच्या कामी लागली आहेत. रविवारीही अशाच एका चकमकीची सुरुवात झाल्याचं वृत्त आहे.

रविवारी सकाळपासून अनंतनाग येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. अनंतनाग येथील पोशकीरेरी भागात एक ते दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्या आधारावर शोधमोहीम राबवण्यात आली. त्यामुळे ही चकमक झडत आहे.

दुसरीकडे बारामुल्ला जिल्ह्यातही सुरक्षा दलांनी लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी निगडीत तीन जणांना अटक केली आहे. या तिघांकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. या तिघांची ओळख पटली असून त्यांची नावं मुश्ताक अहमद मीर उर्फ लश्किरी, मुदसिर अहमद मीर आणि अतहर शमास अशी असून ते तिघेही सोपोर इथले रहिवासी आहेत. ही कारवाई हिंदुस्थानी सैन्याच्या 22 राष्ट्रीय रायफल्सचे जवान, सीआरपीएफच्या 179 बटालियनचे जवान आणि सोपोर पोलीस यांनी संयुक्तरित्या केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या