जम्मू कश्मीरच्या उभरत्या क्रिकेटरचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू, Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

सोशल मीडियावर दररोज विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे मनोरंजनात्मक तर काही व्हिडीओ अगदीच भयंकर असतात. असाच एक जम्मू कश्मीरमधला भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून सर्वांनीच हळहळ व्यक्त केली असून एक चांगला खेळाडू गमावल्याची भावना जम्मू कश्मीरच्या लोकांनी व्यक्त केली आहे.

रस्ते अपघातात मृत्यू झालेला तरुणाचे नाव फरीद हुसैन असून तो जम्मू कश्मीरचा प्रसिद्ध क्रिकेटर आहे. तसेच व्हायरल होणारा व्हिडीओ हा पुंछ जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. फरीद त्याच्या दुचाकीवरून प्रवास करत होता. ज्या मार्गाने तो जात होता, त्या मार्गावर एक चारचाकी रस्त्यावर उभी होती. दुचाकीवरून जात असताना फरीद त्या गाडीजवळ आला असता चारचाकी चालकाने अचानक दरवाजा उघडला आणि मागून दुचाकीवरून येणारा हुसैन दरवाजाला जोरदार ठोकला. या भयंकर अपघातात त्याला गंभीर दुखापती झाली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. ABP न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.