जम्मू-कश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

426

जम्मू -कश्मीरमधील अनंतनाग येथे लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. जम्मू-काश्मीरमधल्या बिजबेहरा येथील संगम भागात ही चकमक झाली.

स्थानिक पोलीस, सीआरपीएफ आणि जवानांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. दहशतवाद्यांनी मध्यरात्रीनंतर या परिसरात गोळीबार सुरू केला होता. या गोळीबाराला जवानांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. यानंतर जवानांकडून संयुक्त शोधमोहीम राबवण्यात आली. त्यावेळी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या