Pulwama encounter Live हिंदुस्थानचे आणखी तीन जवान जखमी, पुन्हा चकमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। श्रीनगर

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक उडाली आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे दोन कमांडर ठार करण्यात हिंदुस्थानच्या लष्कराला यश आले आहे. दरम्यान, उडालेल्या चकमकीत एका मेजरसह चार जवान शहीद झाले. तर दुपारनंतर पुन्हा एकदा सुरू झालेल्या गोळीबारामध्ये एका लेफ्टनंट कर्नलसह तीन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Pulwama Encounter Live Updates:

  • जखमींमध्ये एक लेफ्टनंट कर्नल असल्याची माहिती
  • हिंदुस्थानचे आणखी तीन जवान जखमी
  • दोन्ही बाजूने गोळीबार सुरू
  • पिंगलान भागात दहशतवादी आणि हिंदुस्थानच्या लष्करात पुन्हा चकमक
  • आणखी एक दहशतवादी लपल्याची शक्यता, शोध मोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे
  • वाचा बातमी Pulwama चा बदला घेतला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन कमांडरचा खात्मा

    • जैश-ए-मोहम्मदचे दोन कमांडर ज्या घरात लपले होते, त्याच्यावर बॉम्ब डागून इमारत उडवली
    • जैश-ए-मोहम्मदच्या दोन कमांडराना ठार केले
    • जैश-ए-मोहम्मदचा कमांडर गाजी अब्दुल रशीद उर्फ कामरान यांना घेरलं

        • पुन्हा गोळीबार सुरू
        • पुंछमधून पाकव्याप्त कश्मीरमधील रावलकोट येथे जाणारी बससेवा बंद करण्यात आली

        • पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, पुंछमध्ये रात्री केला गोळीबार

        • दरम्यान, डेहराडूनमध्ये मेजर चित्रेश सिंग बिष्ट यांच्यावर अंत्यसंस्कार

    Pulwama Encounter Live Updates:

        • अद्याप दहशतवादी हाती लागले नसल्याने, पिंगलानकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर चेक पोस्ट

    वाचा बातमी पिंगलान चकमकीत मेजरसह 4 शहीद; पुलवामात कर्फ्यु

        • चकमक थांबवण्यात आली, शोध मोहीम सुरू
        • जैश-ए-मोहम्मदचेच दहशतवादी असल्याची शक्यता
        • आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये चेक पोस्ट उभारण्यात आले असून वाहनांची तपासणी सुरू आहे
        • तीन किमीपर्यंतचा भाग पूर्ण बंद करण्यात आला
        • कश्मीरमध्ये गेल्या पाच दिवसांत 45 जवान शहीद
        • काही काळासाठी गोळीबार थांबला असल्याची माहिती
        • मेजर सह चार जवान शहीद 

        • चकमकीत एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त (वृत्तवाहिनी आजतक)
        • आदिल अहमद दार या दहशतवाद्याचे सहकारी असण्याची शक्यता
        • जम्मू-कश्मीर भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे
        • गोळीबार सतत सुरू
        • एका मेजरसह चार जवान जखमी झाल्याचे वृत्त
        • दोन्ही बाजूंनी गोळीबार, रात्री 12 वाजता ही चकमक सुरू
        • लष्कराने दहशतवाद्यांना घेरले
        • दोन ते तीन दहशतवादी लपल्याची शक्यता
        • पुलवामा जिल्ह्यात पिंगलान भागात चकमक सुरू

    पुलवामात सीआरपीएफच्या जवानांवर 14 फेब्रुवारी रोजी आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. यात 40 जवान शहीद झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. यापार्श्वभूमीवर या भागात सुरक्षा दलाने जोरदार शोधमोहीम सुरू केली असून याच मोहिमेदरम्यान पिंगलान येथे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतर जवानांनी परिसराला घेरले असून सुरक्षा दल व दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक सुरू आहे.