जम्मू-कश्मीरला राज्याचा दर्जा द्या! सर्वपक्षीय नेत्यांची मागणी 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू- कश्मीरला तात्काळ राज्याचा दर्जा देऊन लोकशाही प्रक्रिया पुनर्स्थापित करावी, अशी मागणी जम्मू-कश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.

माजी खासदार शेख अब्दुल रेहमान यांच्या जम्मू येथील निवासस्थानी नुकत्याच झालेल्या बैठकीत ही मागणी केली आहे. यावेळी काँग्रेसचे मुख्य प्रवत्ते रवींद्र शर्मा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रदेशप्रमुख मनीष साहनी, नॅशनल कॉन्फरन्स जम्मूचे अध्यक्ष रतनलाल गुप्ता, शिरोमणी अकाली दलाचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्रसिंग खालसा, सर्वपक्षीय संयुक्त मोर्चाचे आयडी खजुरिया, सीपीएमचे हरिसिंग, आयडीपीचे नरेंद्र खजुरिया, पीडीपीचे वीरेंद्र सिंग, विकास बक्षी आदी बडे नेते उपस्थित होते.

शिवसेनेच्या मागणीला पाठिंबा

पवित्र श्री अमरनाथ यात्रेची सशुल्क नोंदणी रद्द करा, या शिवसेनेच्या मागणीला सर्व नेत्यांनी पाठिंबा दर्शवला. सार्वजनिक समस्यांवर आवाज उठवण्यासाठी  जम्मू-कश्मीरमध्ये ब्लॉक आणि पंचायत स्तरावर नुक्कड सभा आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.