जम्मू कश्मीरमध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार, केरन सेक्टरमधून मोठा शस्त्रसाठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमध्ये आज वेगवेगळ्या भागात जवानांनी केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांना चांगलाच धक्का दिला. पुलवामा व कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्याांचा खात्मा करण्यात आला तर व केरन सेक्टरमध्ये जवानांनी केलेल्या कारवाईत मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

कुलगाम जिल्ह्यातील चिंगम भागात दहशतवादी व जवानांमध्ये सध्या चकमक सुरू असून आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर शनिवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यातील दडुरा भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. घटनास्थळावरून जवानांनी दोन एके 47 रायफलही जप्त केल्या आहेत.

दरम्यान शुक्रवारी रात्री उत्तर कश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये जवानांनी दहशतवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला. या शस्त्रास्त्रांची पाकिस्तानातून तस्करी करण्यात आली आहे. या साठ्यात चार एके 47 रायफल्स, आठ काडतुसं, रायफलच्या 240 बुलेट व काही बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत.