
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द करण्यात आले आहे. जम्मू-कश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्र शासित प्रदेशात राज्याचे विभाजन करण्यात आले आहे. या निर्णयानंतर आता राज्यातील परिस्थिती सामान्य होत आहे. लोक घराबाहेर पडून लागले असून खरेदी-विक्री व्यवहारही सुरु झाले आहेत. परंतु उद्या ‘शुक्रवार’, आणि सोमवाीर ‘ईद’ असल्याने पुढचे काही दिवस खोऱ्यात महत्त्वाचे असणार आहेत.
कलम 370 रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आल्याने जम्मू-कश्मीरमध्ये हिंसाचार उसळण्याची शक्यता होती. याच पार्श्वभूमिवर राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आला होता. तसेच लष्करी जवानांचा मोठा फौजफाटाही तैनात आहे. कलम 370 रद्द झाल्यानंतर काही ठिकाणी तुरळक दगडफेकीच्या घटना झाल्याचे वृत्त होते. परंतु आता स्थिती सामान्य होत आहे. याचे फोटो ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी कश्मीर नागरिकांसोबत बिर्याणी डोप्लोमसी करत त्यांच्याशी चर्चा केली होती. एकत्र भोजन करताना त्यांनी कश्मीरींसोबत उर्दुमध्ये संभाषणही केले. आता गुरुवारी कश्मीरमधील परिस्थिती सुधारत असून लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत. वाण्याच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी रांगा लागल्या आहेत.
#JammuAndKashmir: Visuals of earlier in the day from Doda city. pic.twitter.com/5oTKtCb6hQ
— ANI (@ANI) August 8, 2019



























































