भाजप पीडीपी युतीवर मेहबुबा म्हणाल्या, ‘आम्ही सैतानासोबत युती केली’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2015  साली जम्मू कश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपचे संयुक्त सरकार सत्तेवर आले होते. यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या आम्ही सैतानासोबत युती केली होती. तसेच आम्ही आमच्या अटींवर युती केली होती असेही मुफ्ती म्हणाल्या.

NDTV या वृत्तवाहिनीशी बोलताना मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की “जोपर्यंत कलम 370 पुन्हा लागू होत नाही तोपर्यंत आपण निवडणूक लढवणार नाही.” राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

2015 साली पीडीपीने भाजपसोबत युती केली होती. त्यावर मुफ्ती म्हणाल्या की, “माझ्या वडिलांने सैतानासोबत युती केली होती. आम्ही नरेंद्र मोदी यांच्या हातमिळवणी केलीच नव्हती, आम्ही पंतप्रधान मोदींसोबत हात मिळवला होता. कश्मीरच्या विकासासाठी आम्ही हे पाऊल पुढे टाकले होते. आम्ही दिलेल्या अटीवर ती युती झाली होती. भाजपने तेव्हा सर्व अटी मान्य केल्या. पण जेव्हा सरकर कोसळले तेव्हा त्यांनी तेच केले जे त्यांनी ठरवले होते.