मतपत्रिकेद्वारे होणार जम्मू कश्मीरमध्ये पंचायत निवडणूका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरला केंद्र शासित प्रदेशाचा विशेष दर्जा दिल्यानंतर पहिल्यांदाच येथे निवडणूका होणार आहेत. लवकरच जम्मू कश्मीरमध्ये पंचायत निवडणूका होणार असून त्यासाठी मतपत्रिकेचा वापर करण्यात येणार आहे. जम्मू कश्मीरच्या पंचायत निवडणूका या आठ ठप्प्यात होणार असून त्यासाठी मतपत्रिका वापरण्यात येणार आहे. लवकरच या निवडणूकांची तारिख जाहीर करण्यात येईल, असे जम्मू कश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी शैलेंद्र कुमार यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू कश्मीरमधून 6 ऑगस्ट रोजी कलम 370 हटविल्याची घोषणा केली. तसेच हे कलम हटविल्यानंतर जम्मू कश्मीरचे विभाजन करून लेह लडाख हे वेगळे करण्यात आले. जम्मू कश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला असून लडाख व जम्मू कश्मीर हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आले.