
जम्मू कश्मीरच्या पूंछ इथे शुक्रवारी संध्याकाळी हिंदुस्थानी सैन्याच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला झाल्याचं वृत्त आहे. या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्त्युत्तर देत गोळीबार केला. या हल्ल्यात अद्याप कुणीही जखमी अथवा मृत्युमुखी पडल्याचं वृत्त नाही.
काही आठवड्यांपूर्वी राजौरीतील डेरा की गली येथे झालेल्या हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते. त्यानंतर सैन्यावरचा हा दुसरा हल्ला आहे. आधी हल्ला झालेल्या ठिकाणापासून 40 किमी अंतरावर हा दुसरा हल्ला करण्यात आला आहे.
या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी या संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. गुरुवारी जम्मू कश्मीर पोलिसांनी राजौरीतील मांजाकोट परिसरात शोधमोहीम राबवली होती. त्या दरम्यान 4 टिफिन बॉम्ब, आयईडी, एक बुलेट राऊंड, वॉकी टॉकी सेट आणि इतर वस्तू जप्त केल्या.
























































