
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेला गती दिली आहे. सोपोरमधील वारपोरामध्ये सुरक्षा दलाच्या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलात आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला आहे. लष्कर, सीआरपीएफचे जवान आणि 22 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी एकत्रितपणे सोपोरमध्ये शोधमाहिम हाती घेतली होती. दहशतवादी लपल्याची शक्यता असलेल्या भागाला घेराव घातल्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाला यश आले. या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे.
Baramulla: Exchange of fire underway between terrorists and security forces in Malmapanpora area of Sopore. More details awaited. #JammuKashmir
— ANI (@ANI) August 3, 2019
#UPDATE Shopian encounter: One more terrorist killed. Operation being concluded. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) August 3, 2019
शुक्रवारी झालेल्या चकमकीत शोपियामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. जीनत इस्लाम असे दहशतवाद्याचे नाव असून तो जैश ए मोहम्मदशी संबंधीत होता. कश्मीर खोऱ्यातील अनेक घातपातांमध्ये त्याचा हात होता. या चकमकीत एक जवानही शहीद झाला आहे.






















































