जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात उडाली चकमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात मंगळवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक उडाली आहे. या चकमकीत अजून कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.

शोपिया जिल्ह्याच्या जैनापोरा भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती सैन्याला मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलाने इथे शोधमोहीम राबवली तेव्हा काही दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यावर जवानांनी प्रत्युतरादाखल गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली. अजूनही ही चकमक सुरू असून सैन्याने संपूर्ण भागाचा घेराव घातला आहे.