#JammuKashmir अवंतीपोरा भागात झालेल्या चकमकीत एक जवान आणि पोलीस शहीद

341

जम्मू कश्मीरच्या अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांशी सुरक्षा दलाची चकमक सुरू आहे. या चकमकीत हिंदुस्थानी सैन्याचा एक जवान आणि एक पोलीस अधिकारी शहीद झाले आहेत. तर या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. अवंतीपोराच्या वनभागात ही चकमक सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी जम्मू कश्मीरच्या त्राल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार या भागात शोधमोहीम राबवण्यात आली. रविवारी सकाळी सुरू झालेल्या या मोहिमेत 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरण्यात आलं. दहशतवाद्यांकडून यावेळी गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या