
जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना मारण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. मृतांमध्ये भाजप नेत्याला मारणार्या एका दहशतवाद्याचाही समावेश आहे.
Encounter underway at Watnira area of Bandipora. Police & security forces at the spot. Further details shall follow: J&K Police
— ANI (@ANI) September 26, 2021
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कश्मीरच्या बांदीपुरा भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती, तेव्हा पोलीस आणि सैन्याने या भागात शोधमोहीम राबवली. तेव्हा दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला आणि चमक सुरू झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. मृत दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.




























































