दिवसाला 15 हजार भाविक करू शकतील वैष्णोदेवीची यात्रा

येत्या 1 नोव्हेंबरपासून वैष्णोदेवीचे दर्शन दररोज 15 हजार भाविकांना घेता घेणार आहे. जम्मू- कश्मीरच्या प्रशासनाने आज हा निर्णय घेतला. सध्या प्रतिदिन फक्त सात हजार भाविकांना वैष्णोदेवीचे दर्शन घेता येत होते. ही मर्यादा आता वाढवण्यात आली आहे.

आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यांतर्गत राज्य कार्यकारीणी समितीने शुक्रवारी नवीन एसओपी जारी केली. त्यानुसार आता दर दिवशी 15 हजार भाविकांना वैष्णोदेवीची यात्रा करता येईल. नवी नियमावली 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.

माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व भक्तनिवासे एसओपीचे पालन करून सुरू झाली आहेत. याव्यतिरिक्त बॅटरीवर चालणारी वाहने, रोपवे आणि हेलिकॉप्टर सेवा हळूहळू पूर्वव्रत होत आहेत.

कोरोना संकटामुळे वैष्णोदेवीचे मंदिर मार्चपासून बंद होते. त्यानंतर पाच महिन्यांनी 16 ऑगस्टपासून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यावेळी पहिल्या आठवडय़ात दररोज फक्त दोन हजार भाविकांना यात्रेसाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामध्ये बाहेरील 100 भाविकांचा समावेश होता.

आपली प्रतिक्रिया द्या