बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत असते. ती आपल्या चाहत्यांसोबत कायम आगामी प्रोजेक्ट, फोटो, व्हिडीओ शेअर करत असते, नुकतेच जान्हवीने आपल्या इंस्टाग्रामवर लाल निळ्या साडीतील फोटो शेअर करुन सर्वांचेच लक्ष वेधले आहे. यामध्ये तिच्या साडीपेक्षा ब्लाऊज आणि त्यावर लिहीलेले मजकूर लक्ष वेधत आहे. तिने ब्लाऊजच्या पाठीमागे 6 नंबर आणि माही असे लिहीलेले दिसत आहे. तिचा आगामी सिनेमा ‘मिस्टर अॅण्ड मिसेज माही’ सिनेमाशी कनेक्शन आहे. या सिनेमात जान्हवीचा जर्सी नंबर 6 असणार आहे. या सिनेमात राजकुमार राव आणि जान्हवी कपूर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.