पोलीस आयुक्तांच्या हस्ते शिपायांच्या गुणवंत मुलांचा सत्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शालान्त परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षाही अधिक गुण मिळविलेल्या पोलीस अंमलदारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार जन सहयोग फाऊंडेशनतर्फे पोलीस क्लब (आझाद मैदान) येथील प्रेरणा हॉलमध्ये गुरुवारी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते मुंबईतील पोलीस शिपायांच्या गुणवंत मुलांना गौरविण्यात येणार आहे. मुंबई प्रशासन विभागाचे सहपोलीस आयुक्त एस. जयकुमार, उपायुक्त तेजस्वी सातपुते आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर पवार यांनी दिली.