जपान चंद्रावर पाठवणार 250 ग्रॅमचा रोबोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंतराळ संशोधनात चंद्र ग्रहाला मुख्य स्थान आहे. अमेरिका, चीन, ब्रिटन, रशिया या राष्ट्रांनी चंद्रमोहिमेवर नेहमीच लक्ष केंद्रीत केले आहे. अशातच जपान तरी कसं मागे राहील. जपानची अंतराळ संस्था जॅक्सा चंद्रावर रूप बदलणारा म्हणजेच ट्रान्सफोर्मेबल रोबोट पाठवण्याची तयारी करत आहे. साधारण 250 ग्रॅम वजनाचा हा रोबोट पुढच्या वर्षी चंद्रावर पाठवला जाईल.

ट्रान्सफोर्मेबल रोबोट वजनाने अतिशय हलका आणि बॉलच्या आकाराचा असेल. त्याचा व्यास आठ सेमी आणि वजन 250 ग्रॅम असेल. चंद्रासारख्या प्रतिपूल परिस्थितीत हा रोबोट प्रवास करू शकेल. तो स्वतŠला कारमध्ये रुपांतरीत करू शकले जेणेकरून रोलिंगऐवजी धावू शकेल. यामध्ये बरीच वैज्ञानिक उपकरणे असतील. जॅक्सा केसथ टॉमी कंपनी, सोनी ग्रुप काॅर्पेरेशन आणि दोशिशा युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तपणे बॉल आकाराचा रोबोट तयार केला आहे. चंद्राच्या संपूर्ण प्रवासादरम्यान ट्रान्सफोर्मेबल रोबोट एखाद्या बॉलसारखाच राहील. जपानची जॅक्सा ही अंतराळ संस्था हिंदुस्थानच्या चांद्रयान-3 मोहिमेतदेखील मदत करणार आहे.