फिटनेस टेस्ट प्रकरण – राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमी-बुमराहमध्ये वाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेळाडूंच्या दुखापतीवर योग्य तो उपचार करण्यात अपयशी ठरत असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमी आणि हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यामधील वाद आता चव्हाटय़ावर आला आहे. जसप्रीत बुमराहने दुखापतीवर वैयक्तिकपणे परदेशात उपचार केले. आता हिंदुस्थानसाठी खेळण्याआधी जसप्रीत बुमराहला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. मात्र राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमी ही टेस्ट घेण्यास तयार नाही. या प्रकरणामध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली हस्तक्षेप करणार आहे. राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीचे संचालक राहुल द्रविड यांच्याशी ते संपर्क साधणार आहेत.

– राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीचे अध्यक्ष राहुल द्रविड यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले की, जर जसप्रीत बुमराहने दुखापतीतून बाहेर येण्यासाठी खासगी डॉक्टरांचा सल्ला घेतला असेल तर राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमी त्याची फिटेनस टेस्ट कशी काय घेऊ शकते?

– राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीने उपचार केले नाही तर ते फिटनेस प्रमाणपत्र कसे काय देणार, असा सवाल राहुल द्रविड यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. भविष्यात जर काही समस्या निर्माण झाली तर काय करणार? राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमी अशा गोष्टीसाठी कसे काय प्रमाणपत्र देईल ज्याबद्दल त्याला काहीच माहीत नाही, असे राहुल द्रविड यांचे म्हणणे आहे.