आझम खानवर भडकले जावेद अख्तर, कारवाई करण्याची केली मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

भाजप खासदार रमादेवी यांच्याबाबत लोकसभेत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आझम खान यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठत आहे. प्रसिद्ध गीतकार व माजी राज्यसभा खासदार जावेद अख्तर हे देखील त्यांच्यावर भडकले असून त्यांनी खान यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

जावेद अख्तर यांनी ट्विटरवरून खान यांना फटकारले आहे. ‘आझम खान यांनी संसदेच्या अध्यक्षांच्या खुर्चीत बसलेल्या महिला खासदाराबाबत केलेले वक्तव्य निषेधार्थ आहेत. ते फारच अश्लील व घृणास्पद आहेत. त्यामुळे अध्यक्षांनी त्यांच्यावर अशी कारवाई करावी की ते आयुष्यभर विसरू शकत नाही’, असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले आहे.