”कश्मीर अवर्स”च्या उपदव्यापात खेळाडूंची उडी; मियांदाद, आफ्रिदी एलओसीवर मोर्चा काढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू -कश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हिंदुस्थानने हटवल्यावर पाकिस्तानी राजकारण्यांनी मोठा थयथयाट सुरु केला आहे. पाकिस्तानातील राजकारणी आणि मान्यवरांनी सुरु केलेल्या “कश्मीर अवर” या उपदव्यापी चळवळीत आता पाकिस्तानी क्रिकेटपटूंनीही उडी घेतली आहे. आपण कश्मिरी जनतेने हिंदुस्थानविरोधी चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ( एलओसी ) जाणार असल्याचे ट्वीट अष्टपैलू क्रिकेटर शाहिद आफ्रिदी आणि पाकचा माजी कर्णधार जावेद मियांदाद याने केले आहे.

शाहिद आफ्रिदी एलओसीवरील गोळीबारात ठार झालेल्या नागरिकाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाचे सांत्वनही करणार आहे. तर जावेद मियांदाद याने आपण एलओसीवर मोर्चा घेऊन जाणाऱ्या लोकांसोबत आहोत. आम्ही एलओसीवर जाऊन कश्मिरी जनतेच्या हितासाठी प्रार्थना करणार आहोत, असे सांगितले . कश्मीरप्रश्न हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांनी शांततेने आणि चर्चेने सोडवावा असे मतही त्याने व्यक्त केले.