जावा 2.1ची स्टाईलबाज एन्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जावा 2.1 च्या प्रवेशाची घोषणा करत जावा फोर्टी टू परिवारात तीन देखणे सदस्य दाखल होत आहेत. सध्याच्या आगामी उत्पादनांत क्लासिक स्पोर्टस्चा दिमाख अनुभवता येईल. मोटरसायकलची एक्स-शोरूम दिल्ली किंमत रु. 1,83,941 इतकी आहे. या नव्याने दाखल होणाऱ्या उत्पादनांविषयी बोलताना क्लासिक लीजंड्सचे सीईओ आशीष सिंग जोशी म्हणाले की, मागील वर्षी बीएस 6 इंजिन घेऊन दाखल झालो. आमच्या मोटरसायकलची कामगिरी आणखी चांगली व्हावी, ती चालवताना बाईकस्वाराने आमचे नाव काढावे यादृष्टीने या नवीन उत्पादनांना 2.1 संबोधन दिले आहे. या नव्याकोऱ्या दिमाखात ग्राहकांना आकर्षित करणारी वैशिष्टय़े समाविष्ट असून मोठी सीट देण्यात आली आहे, त्यामधील चांगल्या पद्धतीने ट्यून होणारे क्रॉस पोर्ट इंजिन सुखद धक्का देणारे ठरेल.