“Jawan” ने मोडला “Pathan” चा विक्रम; 800 कोटी कमाईसह केला एलाइट क्लबमध्ये प्रवेश

अॅटली दिग्दर्शित जवान चित्रपट देशातच नव्हे तर जागतिक बॉक्सऑफिसवर देखील चांगली कमाई करत आहे. बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळख असलेल्या शाहरुख खानचा बहुचर्चित जवान सिनेमा 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. सोमवारी या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 800 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. शाहरूखसोबत नयनतारा आणि विजय सेतूपती हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत.

चित्रपट व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी आपल्या X हँडलने जवान चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर 800 कोटी एलाइट क्लबमध्ये प्रवेश केल्याचे म्हटले आहे. चित्रपटाने 11 व्या दिवशी फक्त हिंदुस्थानात तब्बल 1390142 तिकीटे विकली आहेत.

तेलगू भाषेत प्रदर्शित झालेल्या 682 शोने 0.85 कोटीची कमाई केली, प्रत्येक शो मागे 12, 463 रूपयांची कमाई केली. तमिळ भाषेत एकूण 461 शो प्रदर्शित झाले. या शो ने 0.81 कोटींची कमाई केली. प्रत्येक शो मागे 17,570 रूपयांची कमाई केली.