भाजपने ओबीसींच्या नेतृत्वाला संपवले; जयंत पाटील यांचे टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्या भाजपने ओबीसींच्या नेतृत्वाला संपवण्याचे काम केले तोच भाजप आज ओबीसींच्या बाजूने गळा काढत असून याच्यासारखा विरोधाभास नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  आज भाजपवर टीकास्त्र सोडले.

लातूर जिह्यातील शिरूर अनंतपाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनावरून भाजपवर जोरदार टीका केली.

भाजपचे नेते ओबीसी आरक्षणावर गळा काढून घोषणा देत आहेत; मात्र याच भाजपने ओबीसी नेते छगन भुजबळ यांना अडीच वर्षे तुरुंगात बसवले, तर दुसरीकडे एकनाथ खडसेंसारख्या ओबीसी नेत्याला घरी घालवण्याचे काम केले, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.