
लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे विधनासभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर किती पलटी मारून बसलेत हे महाराष्ट्राला माहीत आहे. चौकशी लागली, थोडीशी फाईल्स दाखवली की माणसं रिव्हर्स गिअर टाकतात, त्यांचा रिव्हर्स गिअर तर मागेच पडलाय, असा टोला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांना लगावला.
उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने केलेला विकास बघायला राज ठाकरे कधी गेले होते? मला त्यांचे भारी काwतुक वाटतेय. तेच म्हणतोय रिव्हर्स गिअर टाकलाय, प्लेट बदलली आहे. थोडय़ा दिवसाने आणखी काही वेगळे बोलतील, असे सांगत जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाची खिल्ली उडवली.
स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय त्यांचा टीआरपी वाढत नाही, त्यांना कोणी महत्त्व देत नाही. त्यांचे कुणी ऐकत नाही. त्यामुळे अशा विझत चाललेल्या लोकांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणाकडे फारसे पाहण्याची गरज नसल्याचे जयंत पाटील म्हणाले.
मते खाण्यासाठी मनसे भाजपची बी टीम
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची मते खाण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे. भाजप आणि त्यांचे इंटरनल सेटींग झालेय. एपंदर त्यांच्या भाषणातून ते स्पष्टपणे दिसत असल्याचे जयंत पाटील म्हणाले. एकटय़ा भाजपची डाळ शिजत नाही. त्यामुळे मते खाण्यासाठी भाजपने एमआयएम, मनसे यासारख्या अनेक बी टीम बाळगायला सुरुवात केली असल्याचे जयंत पाटील म्हणाले.


























































