जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेचा आज निकाल

सामना प्रतिनिधी । मुंबई

देशातील आयआयटी आणि तत्सम संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई ऍडव्हान्स्ड-2019 परीक्षेचा निकाल आज शुक्रवार, 14 जून रोजी सकाळी 10 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. आयआयटी रुरकीच्या वतीने यंदा ही परीक्षा घेण्यात आली होती. जेईई ऍडव्हान्स्डचा निकाल je&erdved.aced.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. 27 मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.