
जेईई मेन्स परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार आता जेईई अॅडव्हान्स परीक्षेची तयारी करीत असून ही परीक्षा 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी 23 ऑगस्ट रोजी उमेदवारांना हॉलतिकट जारी केले जाणार आहे. दोन सत्रांत ही परीक्षा होणार असून पहिल्या सत्रात सकाळी 9 ते दुपारी 1 तर दुसऱया सत्रात दुपारी अडीच ते पाच वाजेपर्यंत परीक्षा होणार आहे. 11 सप्टेंबर रोजी या परीक्षेचा अंतिम निकाल घोषित केला जाणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देशातील आयआयटीमध्ये प्रवेश मिळणार आहे.
जेईई मेन्समधील निकालाच्या आधारे चांगले पर्सेंटाईल मिळालेले विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षा देऊ शकतील. या परीक्षेस पात्र ठरण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विविध प्रवर्गासाठी कटऑफ जाहीर केले आहे. त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी 88.412 पर्सेंटाईल्स, सर्वसाधारण ईडब्लूएससाठी 63.111, ओबीसी 67.009, एससी 43.082, एसटी 26.777 निर्धारित करण्यात आले आहे.























































