मोठी बातमी – जेफ बेझोसने रचला इतिहास! अंतराळातून पृथ्वीवर सुखरूप परतले

अंतराळ प्रवासाचा एक नवीन इतिहास रचला गेला आहे. अब्जाधीश जेफ बेझोस यांची स्पेस कंपनी ब्लू ओरिजिनचे रॉकेट न्यू शेफर्डने चार प्रवाशांना सुखरूप अंतराळात पोहोचवले होते. यानंतर 4 मिनिटे ही कॅप्सूल अंतराळात राहून पुन्हा पृथ्वीवर सुखरुप परतली आहे. या रॉकेटमध्ये जेफ बेझोस ही होते.

याची लॉन्चिंग 20 जुलै म्हणजेच आज सायंकाळी 6.45 वाजता करण्यात आली आहे. कॅप्सूलने बेझोस यांच्यासह चार जणांना सुमारे चार मिनिटे शून्य गुरुत्वाकर्षणाचा आनंद दिला. यानंतर ही कॅप्सूल 6.52 मिनिटांनी पृथ्वीवर परतली. या कॅप्सूलमधून बाहेर पडताच बेझोस यांनी वॅली फंक यांना कडकडून मीठी मारली आणि म्हणाले की, ‘हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला दिवस होता.’

untitled-2-copy

कॅप्सूलमधून बाहेर पडल्यानंतर चारी अंतरिक्ष यात्रींनी त्यांच्या कुटूंबियांची भेट घेत आनंद साजरा केला. बेझोस आणि त्यांच्या या टीमने शॅम्पेन खोलून आनंदोत्सव साजरा केला. यामध्ये सर्वात आनंदी 82 वर्षीय वॅली फंक या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या