मैत्रिणीसाठी जीव तुटला! जेमिमाने स्मृती मंधानासाठी सोडले WBBL

स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिचे 23 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होते. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. सगळेजण लगीनघाईत रमले असताना अचानक त्यांच्या आनंदावर विरझण पसरले. स्मृतिच्या वडिलांची प्रकृती बिघडली. तिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी स्मृतीच्या मैत्रिणीही आल्या होत्या. यात जेमिमा रॉड्रीक्सही होती. जेमिमा बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्ब्रेन हीट टीमकडून खेळणार होती. मात्र, तिने टुर्नामेंटमध्येच सोडून स्मृतीच्या लग्नासाठी हजेरी लावली होती. स्मृतीच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. अशातही जेमिमाने स्मृतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. डब्ल्यूबीबीएल फ्रैंचाइजीनेही तिच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

ब्रिस्बेन हीटने एक निवेदन जारी करून जेमिमाच्या निर्णयाचा आदर करतो, असे सांगितले. जेमिमासाठी हा एक आव्हानात्मक काळ आहे. ती उर्वरित WBBL मध्ये सहभागी होऊ शकणार नसली तरी, आम्ही तिच्या हिंदुस्थानात राहण्याच्या निर्णयाचे समर्थन करतो. आमचा संघ तिला आणि मानधनाच्या कुटुंबाला शुभेच्छा देत असल्याचे फ्रँचायझीचे सीईओ टेरी स्वेन्सन म्हणाले.