
सध्या शाहीद कपूर व मृणाल ठाकूर हे त्यांचा आगामी चित्रपट जर्सीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. देशभरात जर्सीचे धमाक्यात प्रमोशन होत असताना आता या चित्रपटाला कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने निर्मात्यांनी या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
जर्सी हा चित्रपट येत्या 31 डिसेंबरला रिलीज होणार होता. मात्र देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात ओमायक्रॉनचा धोकाही वाढत आहे. दिल्ली सरकारने मंगळवारी राज्यातील थिएटर, जिम व शाळा बंद केल्या आहेत. त्यामुळे जर्सीच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.




























































