जेट एअरवेजची सप्टेंबरपासून भरारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीन वर्षाच्या कालावधीनंतर जेट एअरवेजची विमाने पुन्हा एकदा उड्डाणासाठी सज्ज झाली आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) जेट एअरवेजला विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी एअर ऑपरेटर प्रमाणपत्र (एओसी) दिले आहे. ज्यामुळे जेट एअरवेज पुन्हा एकदा व्यावसायिक उड्डाणे सुरू करू शकणार आहे. डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. याआधी गृह मंत्रालयाने विमान कंपनीला सुरक्षा मंजुरी दिली होती. तेव्हापासून कंपनी लवकरच आपली सेवा सुरू करेल, अशी अपेक्षा होती. दरम्यान, सप्टेंबरपासून विमानसेवा सुरू करणार असल्याचे जेट एअरवेजने स्पष्ट केले आहे.