ज्वेलर्समध्ये चोरी करणारे दोघे वाहतूक कोंडीमुळ गजाआड

761

न्हावाशेवा येथील सेंटमेरी इंग्रजी शाळेजवळील बालाजी ज्वेलर्समधून भर दुपारी मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना उरणच्या ट्रॅफिक जाममुळे पोलिस कोठडीची हवा खावी लागली आहे. निलेश दत्तू भवारे (30) रा. नेरळ, कर्जत आणि गौरीकेश शिवाजी बोराडे (22रा. हालिवली, कर्जत) अशी या आरोपींची नावे आहेत. पेढीमधून मंगळसूत्र चोरून पळून जाताना राजपाला नाक्याजवळच्या वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे त्यांना पोलिस कोठडीची हवा खावी लागली.

हे दोघे आरोपी चोरी करण्याच्या उद्देशाने उरणमध्ये आले होते. या पैकी निलेशने बालाजी ज्वेलर्स या दुकानात जाऊन 6 ग्रॅम वजनाचे 27 हजार रुपयांचे एक मंगळसूत्र पसंत केले आणि दुकानदाराला पाणी आणायला सांगून दुकानातून पलायन केले. आणि बाहेर मोटारसायकल घेवून उभा असलेल्या गौरीकेश बोराडे याच्या मोटारसायकलवर बसून पळून जाऊ लागले. मात्र राजपाल नाक्यावर असलेल्या वाहतूक कोंडीने त्यांचा घात केला. त्यांचा पाठलाग करत असलेल्या दुकानदाराने नागरीकांच्या मदतीने त्यांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्यावर उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या