नितिश कुमारांचा डाव, झारखंडमधील नव्या समिकरणांमुळे भाजपला धक्का

3547

झारखंड विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. पाच टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दुय्यम केंद्रीय मंत्रिपदावरून नाराज असलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी झारखंडमध्ये मुख्यमंत्री रघुवर दास यांच्याविरोधातच दंड थोपटणाऱ्या भाजपाच्या बंडखोर मंत्र्याला थेट पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे झारखंडमध्ये याआधीच एक मित्रपक्ष गमावलेल्या भाजपला मोठा धक्का बसला आहे.

झारखंडमध्ये 30 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. तत्पूर्वी राज्यात भाजप आणि मित्रपक्षांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या. अशातच नितिश कुमार यांनी स्वबळावर ही निवडणूक लढण्याचे जाहीर केल्याने भाजपला धक्का बसाल होता. आतापर्यंत जेडीयूने येथे 25 उमेदवारही जाहीर केले आहे. यासह एनडीएचा घटकपक्ष असलेली लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) स्वबळावर झारखंड विधानसभा निवडणूक लढणार आहे. नितिश कुमार आणि एलजेपी स्वबळावर निवडणूक लढत असतानाच भाजपाचे मंत्री सरयू राय यांनी मुख्यमंत्र्यांविरोधातच बंडखोरी करत आव्हान उभे केले आहे. याला नितिश कुमार यांनी पाठिंबा दिला आहे.

nitishkumar-f

राय यांनी भाजपविरोधात बंडखोरी करताच नितिश कुमार यांनी उघडपणे त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच राय यांच्यासाठी निवडणुकीत प्रचार करणार असल्याचेही म्हटले आहे. दुसरीकडे झारखंड मुक्ती मोचार्चे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनीही राय यांना उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे.

निवडणूक कार्यक्रम –

एकूण – जागा 81 

  • 30 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात 13 जागांवर मतदान
  • 7 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यात 20 जागांवर मतदान
  • 12 डिसेंबरला तिसऱ्या टप्प्यात 17 जागांवर मतदान
  • 16 डिसेंबरला चौथ्या टप्प्यात 15 जागांवर मतदान
  • 20 डिसेंबरला पाचव्या टप्प्यात 16 जागांवर मतदान23 डिसेंबरला मतमोजणी
आपली प्रतिक्रिया द्या