झारखंड हायकोर्टाने राहुल गांधींची याचिका फेटाळली

झारखंड उच्च न्यायालयाने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची याचिका शुक्रवारी फेटाळली. 2018 साली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला चालणार आहे. खासदार-आमदार कोर्टाच्या समन्स किरोधात राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात याचिक दाखल केली होती. परंतु, त्यांना कोर्टाने दिलासा दिला नाही. केवळ झारखंडच नव्हे तर उत्तर प्रदेशातही राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

अमित शहा यांच्याविरुद्ध वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजप कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली होती. नवीन झा नावाच्या कार्यकर्त्याने रांची कोर्टात तक्रार केली होती. 18 मार्च 2018 रोजी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात भाषण करताना अमित शहा यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. झा यांची तक्रार रांचीच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फेटाळली. परंतु, झा ने रांचीच्या न्याय आयुक्तासमोर पुनर्याचिका दाखल केली. 15 सप्टेंबर 2018 ला या याचिकेला परवानगी देण्यात आली. नंतर राहुल गांधी यांना समन्स बजावले. याविरोधात राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.