
चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना साकीनाक्याच्या संघर्षनगर येथे घडली. मनीषा जाधव असे महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी राजू निळेला साकीनाका पोलिसांनी काही तासांतच अटक केली. मनीषा ही राजूसोबत गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह ऍण्ड रिलेशनशिपमध्ये राहत होती. गेल्या काही दिवसांपासून राजू आणि मनीषामध्ये वाद सुरू होता. राजू हा मनीषाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. मनीषाचे बाहेर कोणासोबत प्रेमप्रकरण असल्याचा राजूला संशय होता. त्यावरून तो मनीषाला मारहाणदेखील करायचा. बुधवारी रात्री राजू आणि मनीषामध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात राजूने घरातल्या सुरीने मनीषाच्या गळ्यावर, छातीवर वार करून तिला जखमी केले. मारहाणीबाबत स्थानिकांनी याची माहिती साकीनाका पोलिसांना कळवली.


























































