
सामना प्रतिनिधी । जिंतूर
जिंतूर तालुक्यातील शिक्षण विभागामार्फत शहरी व ग्रामीण भागातील जि.प. शाळा, महाविद्यालय, खाजगी शाळा व खाजगी महाविद्यालय यांच्या देखरेखीखाली चालतात. परंतु या विभागात प्रभारी राज असल्यामुळे विभागाचा कारभार सर्वत्र ढेपाळलेला आहे. असे चित्र बुधवारी दुपारच्या सुमारास विभागात भेट दिली असता सर्वत्र रिकाम्या खुर्च्या होत्या. एकही कर्मचारी कार्यालयात उपस्थित नव्हता. यामुळे जिंतूर शिक्षण विभागाचा कारभार ढेपाळला असल्याचे स्पट दिसून आले.
28 मे रोजी बारावीचा निकाल लागला असून त्याची माहिती संकलित करण्यासाठी शिक्षण विभागामध्ये हे भेट दिली असता, सदरील विभागांमध्ये कोणीही जबाबदार कर्मचारी उपस्थित नसल्याने गटशिक्षण अधिकारी सुभाष आमले यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला, असता त्यांनी सांगितले की बारावीचा निकाल अद्याप माझ्या कार्यालयाला प्राप्त झाला नाही, त्यामुळे मी आपणास माहिती देऊ शकत नाही, असे सांगून पुढील बोलले टाळे, याच विभागात शिक्षण विस्तार अधिकारी, व लिपिक कर्मचारी मोठ्या प्रमाणात असताना कार्यालयातील सर्वच कर्मचारी अनुपस्थित दिसून आले. याची माहिती गटशिक्षणाधिकारी यांना सांगितले असता मी पाहतो असे म्हणून त्यांनी बोलणे टाळले. कार्यालयात अस्वच्छता शहरासह ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे धडे देणारे शिक्षण विभागच अस्वच्छतेच्या अवस्थेत असल्याने ग्रामीण भागातील शाळा व महाविद्यालयाची काय अवस्था असेल? यावरून दिसून येते शिक्षण विभागामध्ये पुस्तकांचे गठ्ठे पडून त्यावर सर्वत्र धूळ साचली असून धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच ग्रामीण भागातील शिक्षक व मुख्याध्यापक कार्यालयातील कर्मचाऱ्यांची वाट पाहत असून कर्मचारी कधी येतात तात्काळ आत बसून होते.
कायमस्वरूपी कर्मचारी गैरहजर पण कंत्राटी कर्मचारी हजर
कायमस्वरूपी कर्मचारी आज शिक्षण विभागात 100 टक्के गैरहजर दिसून आले गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व लिपिक वर्गांच्या ही खुच्र्या रिकाम्या होत्या. पण याच कार्यालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणारे कर्मचारी दिसून आले. त्यांचा करार मार्च-2019 मध्ये संपला असला तरी पुढील आदेशाची प्रतीक्षा करीत कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते.
बारावीचा निकाल जिंतूरचा 85 टक्के
एकेकाळी जिंतूर शहराला शैक्षणिक बाबतीमध्ये नावलौकिक होते. परंतु सध्या शैक्षणिक विभागांमध्ये जिंतूर हा चौथ्या क्रमांकावर बारावी मध्ये निकाल लागल्याने दिसून येत आहे. जिंतूर शहरातील शाळा व महाविद्यालयाचे गुणवत्ता घसरत चालली आहे. या बाबीकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षणप्रेमी मधून केली जात आहे.































































