
सामना ऑनलाईन । मुंबई
जिओ फोन युजर्सना आजपासून फेसबुक, युट्युब आणि गुगल मॅपसारखे लोकप्रिय अॅप्स उपलब्ध होणार आहेत. मात्र व्हॉट्सअॅपसाठी ग्राहकांना आणखी काही महिने वाट बघावी लागणार आहे.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने मंगळवारी सर्व जिओ फोन युजर्सना १५ ऑगस्ट पासून फेसबुक, युट्युब आणि गुगल मॅपसारख्या सेवा देण्याचे जाहीर केलं होतं. त्यामुळे आजपासून जिओ फोन युजर्स फेसबुक, युट्युब आणि गुगल मॅपच्या सेवेचा आनंद घेऊ शकणार आहेत. या सेवा घेण्यासाठी ग्राहकांना आपल्या जिओ फोनमधील जिओ अॅप स्टोअरमधे जाऊन फेसबुक, युट्युब आणि गुगल मॅप डाऊनलोड करावे लागणार आहे.
यासोबतच आजपासून जिओच्या हाय स्पीड इंटरनेट सर्व्हिस म्हणजे जिओ गीगाफायबर साठी देखील आजपासून रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. यासाठी कंपनीने एक रजिस्ट्रेशन पेज उपलब्ध करून दिले आहे. मात्र अद्याप त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्लॅन किंवा ऑफरबाबत माहिती दिलेली नाही.



























































