संस्कृती बद्दलली ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झाले, जितेंद्र आव्हाडांचा टोला

ncp leader jitendra awhad

ठाण्यात चक्क दिवाळीच्या सकाळी मिंधे गटाकडून गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या गर्दीला मिंध्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मिंधे गटावर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विटरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फटकारले आहे.

ठाण्यातील चिंतामणी चौकात मिंधे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांनी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमासाठी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठेवला होता. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ”महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा दिवाळी पहाट लावणीने साजरी केली गेली. संस्कृती बद्दलली ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झाले”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.